एजाज पठाण, मालेवाडा - कुरखेडा: मौजा चार्वीदंड येथें भव्य जनजागरण मेडावा. दादालोरा खिडकी च्या माध्यमातून पोलीस मदत केंद्र मालेवाडा यांच्या वतीने घेण्यात आला. मा. पोलीस अधीक्षक श्री निलोतफर साहेब. अप्पर पोलीस अधीक्षक श्री अनुज तारे साहेब. मा. अप्पर पोलीस अधीक्षक कुमार चिंता साहेब. यांच्या संकल्पनेतून तसेच मा. श्री साहिल झरकर साहेब कुरखेडा यांच्या मार्गदर्शना खाली भव्य जनजागारारण मेडावा पोलीस मदत केंद्र मालेवाडा येथील प्रभारी अधिकारी श्री राठोड साहेब यांच्या अध्यक्षते खाली घेण्यात आला.
सदर कार्यक्रमात नम्रता स्वयंसेवी संस्था नागपूर येथील अधिकारी व पदाधिकारी उपस्तित होते. आज झालेल्या जनजागरण मेडाव्यात शासनाचे विविध योजना दादालोरा खिडकी च्या माध्यमातून सांगण्यात आले तसेच हॉलि्बॉल स्पर्धा व. महिला करिता रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आले होते आणि समस्त जनते ला भोजनाचे आयोजन केले होते. सदर कार्यक्रमाच्या यशस्वी साठी श्री सुखदेव मडावी मेजर. तलांडे मेजर. कांबडे मेजर मोहुर्ले मॅडम. आणि बिपीन भाऊ देवगडे यांनी सहकार्य केले.