Education: फेब्रुवारी -मार्च २०२३ मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी अर्ज भरण्याची मुदत वाढवण्यात आली आहे , असे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सांगितले आहे. सुधारित वेळापत्रकानुसार ३० नोव्हेंबर पर्यंत नियमित शुल्कासह अर्ज भरता येत होता - मात्र आता २ डिसेंबर पर्यंत विलंब शुल्कासह अर्ज भरता येणार आहे.
तसेच शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी चलन काढून शुल्क बँकेत जमा करण्यासाठी ५ डिसेंबरपर्यंत मुदत असेल, तर विद्यार्थ्यांच्या याद्या, प्रिलिस्ट जमा करण्याची मुदत ७ डिसेंबरपर्यंत असेल - असेही शिक्षण मंडळाने सांगितले.