- गिरीजा कोरेटी माजी सरपंचा तथा महिलाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कोरची यांची मागणी.
कोरची: तालुक्यात कोविड-19 पासुन विकासकामे मंद गतीने होत आहेत. त्यामुळे तालुक्यातील बेरोजगार युवक-युवतींना रोजगार मिळणे कठीण झाले आहे. तालुक्यातील बेरोजगार युवक-युवती रोजगाराच्या शोधात शहराकडे पलायन करत आहेत.
अपुर्ण अवस्थेत असलेले प्रधानमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत रस्ते व पुलाचे काम त्वरित सुरू करावे तसेच रोजगार हमी योजनेअंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायती अंतर्गत गावांमध्ये काम सुरू करुन बेरोजगारांना रोजगार द्यावे.
प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत देऊळभट्टी-पाटीलटोला येथील मागील तीन ते चार वर्षांपासून अपुर्ण अवस्थेत असलेले पुलाचे काम त्वरित सुरु करावे. बेतकाठी वरुन छत्तीसगढला जोडणाऱ्या रस्त्यावरील पुल पाण्याच्या प्रवाहाने वाहुन गेल्यामुळे दळणवळणासाठी अडचण येत आहे म्हणून तेथे नवीन पुल मंजूर करून बांधकाम करावे. वाको वरून छत्तीसगढला जोडणाऱ्या रस्त्यावरील नाल्यावर नवीन पुल मंजूर करुन बांधकाम करण्यात यावे. नांगपुर ते ढोलडोंगरी पर्यंत रस्त्याचे डांबरीकरण करावे. कोटगुल ते कोसमी नं२ पर्यंत रस्त्याचे डांबरीकरण करावे. बेतकाठी ते बोटेकसा पर्यंत रस्त्याचे डांबरीकरणाचे काम सुरु करावे. तालुक्यातील आधार कार्ड केंद्र त्वरित सुरु करावे.
तसेच विकासात्मक दृष्टीने कोरची तालुक्यातील कोटगुल या गावाला तालुक्याचा दर्जा देऊन कोटगुल तालुक्याची निर्मिती करावी. ह्या मागण्या सौ. गिरीजाताई कोरेटी यांनी प्रशासनासमोर मांडल्या आहेत.