⛔ ब्रह्मपुरीतील तरुण युवक आणि युवतींनो सिम फक्त ऑफिसिअल स्टोर वरूनच घ्या..ऑफर च्या नावाखाली तुमच्या नावावर दुसरी सिम ऍक्टिव्ह केली जात आहे. त्या सीम च गैर वापर केल जाऊ शकते.. मुलीनो तुमच नंबर लिक केल जाऊ शकते आणि गोळा सुद्धा केल जाऊ शकते. - बातमी एक्सप्रेस जाहीर सूचना

तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

गडचिरोली: सहायक वीज अभियंत्याची कार्यालयातच गळफास घेऊन आत्महत्या | Batmi Express

Gadchiroli,Gadchiroli Suicide,Gadchiroli News,Gadchiroli Crime,Gadchiroli Live,Gadchiroli Live

Gadchiroli,Gadchiroli Suicide,Gadchiroli News,Gadchiroli Crime,Gadchiroli Live,Gadchiroli Live

गडचिरोली : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या मागच्या भागात बांधकाम विभागांतर्गत विद्युत विभागाचे कार्यालय आहे. या कार्यालयात मृत केशव आखाडे (२७) हा सहायक वीज अभियंता म्हणून कार्यरत होता. आज दुपारी कार्यालयात कुणीच नसताना त्याने छताला गळफास लावून आत्महत्या केली. अशी माहिती पोलिसांनी दिली. 

सहायक अभियंत्याने कार्यालयातच गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी दीड वाजताच्या सुमारास घडली. केशव हा अविवाहित होता. वाशिम जिल्ह्यातील सिल्लोड येथील मूळ रहिवासी असलेला केशव चार-पाच महिन्यांपूर्वीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण करुन गडचिरोली येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत विभागात सहायक अभियंता पदावर रुजू झाला होता. अशी माहिती आहे. मात्र, त्याने आज आत्महत्या केली.

घटनेनंतर पोलिसांनी मर्ग दाखल करून मृतदेहाचा पंचनामा केला, पोलिस निरीक्षक अरविंदकुमार कतलाम यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे. केशव खाडे याने कामाच्या ताणामुळे आत्महत्या केली की त्यामागे अन्य दुसरे कारण आहे. याविषयीचा उलगडा पोलिस तपासातच होईल. मात्र, एका तरुण अभियंत्याने आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.