- वन हक्क पट्टा धारक शेतकऱ्यांचे ऑफलाईन धान्य खरेदीची नोंदणी करून धान खरेदी हमी देण्याची शेतकरी परिषदेची मागणी
कोरची- ऑनलाइन चा भूत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसत असून 2011 पासून आज पर्यंत मिळालेल्या तालुक्यात 1183 वन हक्क पट्टेधारक शेतकऱ्यांचे खरेदी सेंटरमध्ये सॉफ्टवेअर नोंदणी घेत नसल्याने धान्यविक्रीपासून वंचित राहण्याची पाळी येत असलेल्या शेतकऱ्यांचे धान्य ऑफलाइन नोंदणी करून खरेदी करण्यात यावी अशी मागणी शेतकरी परिषदेचे अध्यक्ष नंदकिशोर वैरागडे यांनी केलेली आहे.
गडचिरोली जिल्ह्यात सन 2011 पासून कुरखेडा उपविभागातील 5680 वन जमीन वर आपली उपजीविका करीत असलेल्या शेतकऱ्यांनी मालकी हक्काचे पट्टे दिले. त्याच पट्ट्यावरती बँकेने कर्ज देणे सुरू केले. शेतकऱ्यांनी त्या पट्ट्यावरती धान विक्री सुद्धा आजपर्यंत केले होते. आता ऑनलाईन नोंदणी करून धान खरेदी करण्याची पद्धत शासनाने सुरू केली. त्यामध्ये वनहक्क पट्टेधारक शेतकऱ्यांची नावे सॉफ्टवेअर घेत नसल्याने धान विक्रीपासून शेतकरी वंचित राहण्याची पाळी निर्माण झालेली आहे. शासनाने दोनदा ऑनलाईन नोंदणी मुदत वाढवून दिली आता अजून 30 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ दिली आहे त्यामुळे शासनाने सॉफ्टवेअर मध्ये दुरुस्ती करावी अन्यथा वन हक्क पट्टेधारक शेतकऱ्यांचे धान्य ऑफलाईन नोंदणी करून खरेदी करण्याची हमी द्यावी. अशी मागणी शेतकरी परिषदेचे अध्यक्ष नंदकिशोर वैरागडे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केलेली आहे