गोंडपिपरी :- गोंडपिपरी राज्य महा मार्गे सुरजागड लोह प्रकल्प कडे जाणाऱ्या भरधाव एम एच ४० बी जी ८३०४ हायवाने आज दि.६ गुरुवार दुपारी २ वाजता गोंडपीपरित एम एच ३४ डी. ६२३९ आटोसह, एम एच ३४ बी के ९६७६, एम एच ३४ ९७४१, एम एच ३४ बी एन ५४१६, एम एच ३४११३०, एम एच ४० एस ४५५२ सहा ते सात दुचाकिंसह एका सायकलस्वाराला संदीप हॉटेल समोर जुना बस स्टॉप वर उडविले.
या अपघातात
- धनराज झाडे
- माया धनराज झाडे रा .गोंडपीपरी
- प्रकाश चुदरी सोनपल्ली
गंभीर झाले असून ठाणेदार जीवन राजगुरू, तहसीलदार के डी मेश्राम यांनी घटनास्थळ तात्काळ गाठून धर्मवीर ग्रुप च्या सहकार्याने ग्रामीण रुग्णालय गोंडपीपरित उपचारासाठी दाखल केले. अपघात स्थळी काही काळ तणाव निर्माण झाला होता.