आरमोरी:- वाढदिवसाच्या पार्टीचा खर्च टाळून आरमोरी चे सुरज दिलीप हेमके व विद्या सुरज हेमके या दांपत्यांनी यांनी आपल्या लाडक्या लेकीच्या विहानी च्या तिसऱ्या वाढदिवसानिमित्त, इतिहास इच्छा खातर ताडूरवार नगरातील जिजाऊ अभ्यासिकेत पुस्तके भेट दिली. सुरज हेमके हे पारबताबाई विद्यालय कोरची येथे सहायक शिक्षक पदावर असून विद्या सुरज हेमके हे जिल्हा परिषद हाइस्कूल तथा जुनियर कॉलेज बेडगाव येथे कार्यरत असून सुद्धा विधायक काम करण्याची त्यांची ऊर्जा मनाला वेगळंच समाधान देऊन गेली.तसेच सुरज हेमके हे नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असून कोरची तालुक्यासारख्या दुर्गम भागात अनेकदा रक्तदान शिबिर घेऊन स्वता बरेचदा रक्तदान केलेले आहे.
कोरची तालुक्यातील कुठल्याही नागरिकांना रक्ताची गरज भासल्यास त्यानां ते वेळोवेळी मदत करण्याचे कार्य करीत आहे. कोविड च्या काळात सुध्दा अनेक कोविड झालेल्यानां दवाखान्यात लागणारी सेवा तसेच दवाखान्यात पोहचविण्याचे कार्य त्यांनी अनेकदा केले असून सामाजिक कार्य करण्याची त्यांची आवड असून समाजासाठी काहीतरी वेगळं करण्याची नेहमीच इच्छा असते.तसेच कोरची येथिल नंदनवन कॉलोनी येथे राहत असून भारतीय संस्कृती जोपासता यावी म्हणून हे दांपत्य नवीन नवीन उपक्रमाच्या माध्यमातून सर्वांना एकत्र आणन्याचे कार्य करीत आहे. मागच्या शिवजयंतीला गरजू विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या अभ्यासिकेच्या प्रवास यशस्वी सुरू आहे. दोन विद्यार्थी नोकरीत रुजू झाले आहेत. तीन विद्यार्थी जवळजवळ यशस्वी होण्याच्या मार्गावर आहेत. इच्छापूर्तीचे हे बीजारोपण इतक्या लवकर वटवृक्षात रूपांतर होईल, हा विचार स्वप्नातही आला नव्हता. प्रत्येकानी सुरज हेमके यांच्या या आजच्या कृतीचे आदर्श घेऊन आपल्या वाढदिवसाला एक तरी सामाजिक जबाबदारी उचलावी ,हीच एक सुप्त इच्छा आणि उद्देश तुम्ही केलेली एक छोटीशी मदत सुद्धा आमच्यासाठी लाख मोलाची आहे.
या योगदानाबद्दल मुकूल खेवले, रिंकू झरकर ,ज्योती खेवले अभ्यासिकेतील समस्त विद्यार्थ्यांनी मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहे.