हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिममध्य व लगतच्या पूर्वमध्य बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने, येत्या 48 तासांत राज्यातील बहुतांश भागात पावसाचा येलो आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
कुठं पडणार पाऊस ?
हवामान विभागाने 11 सप्टेंबर पर्यंत कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात पावसाचा जोर असणार आहे तर मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, आणि सोलापूर या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे . तर याचबरोबर मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद, परभणी, लातूर, हिंगोली आणि नांदेडमध्ये पावसाची शक्यता आहे . याव्यतिरिक्त विदर्भातील बुलढाणा, अकोला, वाशीम, अमरावती, वर्धा, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, आणि गडचिरोली या जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे