- आमदार धर्मरावबाबा आत्राम यांचे प्रतिपादन.
कोरची ( रजिस्टर कोरची तालुका प्रतिनिधी ):- दिनांक १८ सप्टेंबर २०२२ रोज - रविवारला शेतकरी, शेतमजूर, दुर्बल घटक बेरोजगार, व्यापारी यांच्या ज्वलंत प्रश्नाबाबत व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनासंदर्भात धर्मरावबाबा राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा दरम्यान कोरची तालुक्यातील कोटगुल परिसरातील लोकांनी मा.राजे धर्मरावबाबा आत्राम, माजी राज्यमंत्री मंत्रालय मुंबई तथा विद्यमान आमदार अहेरी विधानसभा क्षेत्र यांच्याकडे अनेक समस्या मांडल्या.
प्रामुख्याने 33 के.व्ही.विद्युत सब सेंटर, कोटगुल या मुख्य गावाला तालुक्याचा दर्जा देणे, तालुका निर्मिती करणे, कोटगुल येथे ग्रामीण रुग्णालय देणे, नेटवर्क टावर उभारणे, सिंचनाची सोय करणे अश्या अनेक समस्या संबधी चर्चा झाली व त्या समस्या सोडवण्यासंबधी मा.धर्मरावबाबा आत्राम साहेबांनी आश्वासन दिले.
यावेळी मा.भाग्यश्रीताई आत्राम माजी जि.प.अध्यक्षा गडचिरोली, रविभाऊ वासेकर जिल्हाध्यक्ष राकाँपा गडचिरोली, नानाभाऊ नाकाडे, माजी कृषी सभापती जि.प.गडचिरोली, शाहीनभाभी हकीम, महिला जिल्हाअध्यक्षा गडचिरोली, लिलाधर भरडकर रॉ. यु. काँ. जिल्हाअध्यक्ष, अनिल साधवानी रॉ. यु. काँ. कार्याध्यक्ष, फहीमभाई काझी जिल्हा उपाध्यक्ष, सियाराम हलामी ता. अध्यक्ष कोरची, गिरीजा कोरेटी महिला ता. अध्यक्षा कोरची, अविनाश हुमणे, कपिल बागडे, स्वप्नील कराडे, चेतन कराडे, प्रेमसिंग उसेंडी, महेंद्र नुरुटी, अनिल कुंजाम, मंजुषा कुमरे सरपंच कोटगुल, रामसाय कुमरे, केसरबाई दर्रो, रोमन नैताम, ब्रिजलाल कुमरे, पुरण कोरेटी, सोमनाथ कुमरे, लोमन उईके आसाराम सांडील, मन्हेर होळी,धम्मदीप लाडे, विशाल जांभुळे, अंजना मेश्राम, रमाबाई मेश्राम, कौशल्याबाई गावडे, गिरजा डोंगरे, सोहनतीन टेंभुर्णे, अंजना मडावी, कोमल कुमरे व राष्ट्रवादी परिवारातील कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.