तळोधी(बा.): नागभीड तालुक्यातील पळसगांव (खुर्द) येथील प्रेमी युगुलांचे दोन वर्षांपासून एकमेकांशी प्रेम असल्याने विवाह करण्याची कुटुंबाकडे विनंती केली मात्र कुंटुबाकडून विरोध होवू लागल्याने पळसगांव खुर्द येथील महात्मा गांधी तंटामुक्ती समिती कडे अर्ज केला. त्यांनी मुलगा नामे अमोल मनोहर चावरे वय 26 वर्ष व मुलगी नामे करिष्मा राजू शेंडे वय 20 वर्ष या दोघांच्या कागदपत्रे ची पात्रता तपासून तंटामुक्ती समिती च्या वतीने विवाह करण्यास मान्यता देण्यात आली. व पळसगांव खुर्द येथील महात्मा गांधी चौकात तंटामुक्ती समिती च्या वतीने प्रेमी युगुलांचा विवाह लावून देण्यात आले.
यावेळी तंटामुक्ती समिती अध्यक्ष मिलिंद मेश्राम, सरपंच निरज सिध्दमसेट्टीवार, पोलीस पाटील प्रविण रामटेके, बाबुराव ताडाम, सोमाजी वरठी, उपसरपंच नरेंद्र गुरुनुले, प्रकाश बावनकर,भारती डाहारे,लिलाबाई मेश्राम व अनेक नागरिक यावेळी उपस्थित होते.