|
Bhandara Flood Live Updates | कारधा पुल(जुना), भंडारा शहराजवळून वाहणाऱ्या वैनगंगा नदीची पातळी आज दि. 15.08.2022 रोजी रात्री 9.00 वा. 247.44 मी. पाणी पातळीची नोंद घेण्यात आली असुन वैनगंगा नदीने धोका पातळी ओलांडली आहे. इशारा पातळी 245 मीटर असून धोका पातळी 245.50 मीटर आहे.
- सकाळी 5.40 वाजता इशारा पातळी ओलांडली.
- रात्री 9.00 वा. 247.44 मी धोका पातळी ओलांडली
सतत पडणाऱ्या पावसामुळे वै नगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली झाली असून Low Line Area तील काही गावांमध्ये व शहरात देखील पाणी येण्याची शक्यता आहे तरीदेखील नागरिकांनी आवश्यकता असल्यास घराबाहेर पडू नये. व सुरक्षित राहावे सतर्क राहावे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. वैनगंगेची पाणी पातळी वाढत असली तरी पूर परिस्थिती नियंत्रणात असल्याने कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये, मदतीसाठी जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी केले आहे.