ब्रम्हपुरी: ब्रम्हपुरी तालुक्यातील बेलगांव मुरपार येथील शेतशिवारात गेले असता एका इसमावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना आज दि. 8 अगस्त 2022 रोजी उघडकीस आली. मृतकाचे नाव दुर्योधन जयराम ठाकरे रा. शिवनी ता. आरमोरी जि. गडचिरोली असे आहे.
- हेही वाचा : आठवीतील मुलीवर आश्रम शाळेत लैंगिक अत्याचार!
सदर घटनेत मृतक दुर्योधन आपल्या मुलगा आशिष सोबत शेतात गेले असता. शेळ्या करिता चारा गोळा करण्यास शेतालगतच्या जंगल परिसरात मुलगा आशिष झाडावर चढला होता व दुर्योधन झाडाखाली फांद्या गोळा करीत असताना अचानक वाघाने हल्ला करून त्यांना फरफटत जंगलाच्या दिशेने घेऊन गेला.बापाला वाघाने ठार केल्याचे थरारक दृश्य पाहून मुलगा पूर्णतः घाबरून गेला.
उत्तर वनपरिक्षेत्रा मध्ये सदरची घटना घडली असून वाघाने मृतदेह फडफडत नेल्याने मृतदेह हा दक्षिण वनपरिक्षेत्रा अंतर्गत कोसंबी कक्ष क्रमांक 175 हद्दीमध्ये आढळून आला घटनेची माहिती मिळताच घटनास्थळावर वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. यापूर्वी वाघाच्या हल्ल्यात अनेकांना जीव गमवावा लागला आहे, मात्र वनविभागाकडून वाघाच्या बंदोबस्ताकरिता अध्याप कोणतीही पावले उचलले नसल्याने यावेळी नागरिक वाघाचा बंदोबस्त करण्याकरिता वनविभागाच्या अधिकाऱ्यांविरुद्ध आक्रमक झाले होते.