सिंदेवाही: ग्रामपंचायत नवेगाव लोन, तालुका सिंदेवाही, जिल्हा- चंद्रपुर या ग्राम पंचायत कडे अनेक वर्षापासून स्मशान भूमीकडे जाण्यासाठी मार्ग नाही. त्यामुळे येथील नागरिकांना तागायत प्रैतयात्रा स्मशान भूमीकडे नेण्यासाठी रेल्वे मार्गने न्यावे लागते.
अनेक दिवसांपासून येथील नागरिक सातत्याने स्मशानभुमी कडे जाण्यासाठी रत्याची मागणी प्रशासनाला करीत आहे. पण जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, अथवा कोणताही वरीष्ठ अधिकारी याकडे लक्ष न देता दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत नवेगांव लोन साठी हि आजही ग्रामस्थांची मोठी शोकांतिका आहे.
नवेगांव लोन येथील नागरिकांना स्मशानभुमी कडे जाण्यासाठी तात्काळ सुरक्षित मार्ग तयार करून द्या - ग्रामस्थ
बातमी प्रकाशन - टिकाराम श्रावण रंदये आणि ग्रामस्थ.