- Gosikhurd Live Blog Updates ( 9 Aug ) : गोसीखुर्द धरणाचे पाणलोट क्षेत्रात मोठया प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याकरिता पुढील काही तासात धरणाचा विसर्ग 7000 ते 10000 क्युमेक्स पर्यंत टप्प्याटप्प्याने वाढविण्यात येईल. ( 9 AM Updated Time )
Gosikhurd Flood Live Updates: गोसीखुर्द प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सतत मुसळधार पाऊस पडत असल्याने व पाण्याची आवक वाढल्याने धरणाची पाणी पातळी कायम राखण्यासाठी गोसे धरणातून 10 हजार क्युमेक्स विसर्ग टप्याटप्याने वाढविण्यात येत आहे. गोसेखुर्द धरणाचे सर्व 33 दरवाजे ( Gosikhurd Dam Open 33 Gates) उघडण्यात आले आहेत. या सर्व दरवाज्यातून 10 हजार क्युमेक्स ( 10-thousand cumex-water ) पाण्याचा विसर्ग वैनगंगा नदीपात्रात सोडण्यात आलं आहे. यामुळे गोसीखुर्द धरण क्षेत्रा खालील वैनगंगा नदी ओसंडून वाहत आहे. तरी नदीपात्राजवळील गावांना तसेच नदीपात्रामधुन आवा-गमन करणा-या सर्व संबंधीतांनी स्वत:ची काळजी बाळगावी व सतर्क रहावे - प्रकल्प प्रशासनाकडून सुचित करण्यात आले आहे.