Gosikhurd Flood Live Updates (11 Aug) ( 8/11/22 10:00 AM )
आज 11 ऑगस्ट 22, दुपारी 03.00 वा. गोसेखुर्द (भंडारा) धरणाचे 33 गेट 2.5 मीटरने उघडले आहेत. गोसीखुर्द मधून 16242.41 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग वैनगंगा नदीपात्रात होत आहे.
गोसीखुर्द पाणलोट क्षेत्रात वाढ झाल्याने व धरणाच्या ऊर्ध्व बाजूच्या सर्व धरणामधून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू असल्याने गोसेखुर्द प्रकल्पाची पाणीपातळी कायम राखण्यासाठी गोसे प्रकल्पाचे सर्व 33 दरवाजे उघडण्यात ( Gosikhurd Dam Open 33 Gates) आले असून 16242.41 क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे. या प्रकल्पाचे 33 गेट 2.5 मीटरने उघडण्यात आले आहे. गोसीखुर्द मधून 16242.41 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग वैनगंगा नदीपात्रात होत आहे.
गोसीखुर्द धरणामधून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू असल्याने पुढील काही तासात धरणाचा विसर्ग 18522.78 क्युमेक्स पर्यंत वाढविण्यात येईल. तरी वैनगंगा नदीपात्राजवळील गावांना तसेच नदीपात्रामधुन आवा-गमन करणा-या सर्व संबंधीतांनी स्वत:ची काळजी बाळगावी व सतर्क रहावे - प्रकल्प प्रशासनाकडून सुचित करण्यात आले आहे.
- गोसीखुर्द मधून 16056.55 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरु, पाण्याचा विसर्ग पुन्हा वाढणार ( 8/11/22 10:00 AM )
Gosikhurd National Project (GSK)
- Date : 11-08-2022,
- @10
- :00 Hrs.
- Level : 242.390 m (FRL : 245.500 m)
- GS : 605.582 MCM (52.84%)
- LS : 199.675 MCM (26.98%)
- *Inflow & Ouflow 1 Hourly:*
- IF : 66.682 MCM / 18522.78 m³/sec
- OF : 57.631 MCM / 16008.62 m³/sec
- Trend : Rising ( 7 cm)
- Spillway : 16056.55 m³/sec
- PH : Close.
- RBC PH : Close.
- *Total Discharge* : 16056.55 m³/sec
- For Irrigation :
- RBC : Close.
- LBC : Close.
- गोसीखुर्द मधून पुन्हा 14717 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरु ( 8/11/22 6:46 AM )
गोसीखुर्द पाणलोट क्षेत्रात पाऊस पडल्यामुळे व धरणाच्या ऊर्ध्व बाजूच्या सर्व धरणामधून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू असल्याने गोसेखुर्द प्रकल्पाची पाणीपातळी कायम राखण्यासाठी गोसे प्रकल्पाचे सर्व 33 दरवाजे उघडण्यात ( Gosikhurd Dam Open 33 Gates) आले असून 14 हजार 717.93 क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे. या प्रकल्पाचे 23 गेट 2.5 मीटरने तर 10 गेट 2 मीटरने उघडण्यात आले आहे. गोसीखुर्द मधून 14717 . 93 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग वैनगंगा नदीपात्रात होत आहे.