ब्रम्हपुरी: चंद्रपूरच्या ब्रम्हपुरी तालुक्यातील पिंपळगाव भोसले मधून एक धक्कादायक घटनासमोर आली आहे. रात्री 9 वाजून 15 मिनिटाच्या सुमारास पुरामुळे घराची भित कोसळली. या दुर्दैवी घटनेत भिंतीखाली दबून एकाचा जागीच मृत्यू तर चार जण जखमी झाला आहे. श्री. रामकृष्ण तुळशीरामजी गायधने असं या घटनेत मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे.
सविस्तर वृतांत - मागील तीन दिवसापासून सतत पावसामुळे पिंपळगाव भोसले येथे पूरस्थिती निर्माण झाली. श्री सुधीर गायधने यांचे घर पुरामुळे कोसळला व त्यांचे वडील श्री. रामकृष्ण तुळशीरामजी गायधने (वय.70) हे जागीच ठार झाले तर चार जण जखमी झाले आहेत. त्यामुळे इतर घराजवळील शेजारी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन ताबडतोब विटा आणि कवेलू बाजूला करून प्रेत बाहेर काढण्यात आले. श्री. रामकृष्ण तुळशीरामजी गायधने असं या घटनेत मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे. पिंपळगाव भोसले येथे आलेल्या पूरस्थितीमुळे येथील नागरिकांना तागायत प्रैतयात्रा स्मशान भूमीकडे नेण्यासाठी पुरातून प्रवास करावा लागलं.