HighLigths:
- आपातकालीन सेवा करीता बोट देण्याची मागणी गावकऱ्यांची प्रशासनाला केली
- विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान
- गर्भवती महिलाना वेळेवर उपचार नाही
- गावात आरोग्य सेवा नाही
- २०२० साली आला होता महापूर यावर्षी सुद्धा महापूर येण्याची शक्यता
- गोसेखुर्दचे पाणी सोडल्याने पुरस्थिती निर्माण
ब्रम्हपुरी : तालुक्यातील लाडज हे गाव चारही बाजूने वैनगंगा नदीने वेढलेले आहे. लाडज गावाला मागील चार दिवसांपासून पुराने वेढलेले आहे. लाडज गावाला नेहमी बेटाचे स्वरूप प्राप्त होते. गावात आरोग्य सूविधा नाही. त्यामुळे येथील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत होऊ लागलं आहे.
गोसेखुर्द धरणाच्या पाण्याच्या विसर्गामुळे लाडज गाव तिसऱ्यांदा जलमय झालं आहे. गावातील काही भागात पुन्हा वैनगंगा नदीचे पाणी गावात शिरले, घरे,दुकाने व 60% भागातील शेती पाण्याखाली आल्याने, ( Chandrapur Flood situation ) नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. प्रशासनाने पुराची समस्या कायमस्वरूपी निकाली काढावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
लाडज ते चिखलगाव जाणारा मार्ग पूर्णपणे तात्पुरता बंद करण्यात आलं आहे. खालच्या भागातील दुकाने व घरे पाण्याखाली गेली आहे. लाडज गावात तिसऱ्यांदा पुरपरिस्थिती उदभवली आहे.
गोसीखुर्द पाणलोट क्षेत्रात पाऊस आला की पाण्याची पातळी वाढते आणि अचानक आम्हाला दिवसा किंवा रात्री दुसरीकडे आश्रय घ्यावा लागत आहे अशी खंत नागरिकांनी यावेळी व्यक्त केली. प्रशासन किती दिवस मदत करणार, एकदा समस्येचा तोडगा काढा, लाडज गावाचा पुनर्वसन झालं पाहिजेत. अशी मागणी यावेळी नागरिकांनी व महिलांनी केली आहे. ( Chandrapur Flood 2022 )
त्यामुळे स्थानिक प्रशासन जास्त रिक्स घ्यायला तयार नाही शिवाय ज्यांच्याकडे डोंगे आहेत अशा व्यक्तींना जास्त प्रवाहात डोंगे टाकण्यास स्थानिक प्रशासनाकडून मनाई करण्यात आली आहे.
गावात आरोग्य सुविधेचा अभाव असून लहान मुले, गरोदर स्त्रिया, वृध्द नागरिक व इतर साठी एक आपतकालीन बोट उपलब्ध करून देण्याची मागणी गावकऱ्यांनी प्रशासनाला केली आहे.
लाडज गावाच्या सभोवताल पुराचे पाणी असल्यामुळे सर्व मार्ग तात्पुरता बंद करण्यात आलं आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ लागले आहे. कारण मार्ग बंद असल्याने विद्यार्थी शाळेत / महाविद्यालयात जाऊ शकत नाही आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये. यासाठी तात्काळ एक बोट देण्याची मागणी विद्यार्थानी प्रशासनाला केली आहे.
सन 2020 सालच्या महापुराची पुरावृत्ती होण्याचीही मोठी शक्यता यावर्षी सुद्धा करण्यात येत आहे. त्यामुळे तात्काळ प्रशासनाने याची दखल घेवून आवश्यक ती मदत करावी अशी मागणी अमोल रामकृष्ण मोहुर्ले यांच्यासह गावकऱ्यांतून होत आहे.
लाडज गावाच्या पुनर्वसनासाठी ग्रामपंचायत कडून अनेक निवेदन पाठविण्यात आली पण प्रशासनाकडून त्या निवेदनास कधीच प्रतिउत्तर मिळालेले नाही. प्रशासन किंवा लोक प्रतिनिधीला या गावाची आठवण फक्त निवडणूक वेळी येत असते.
लाडज गावाचा पुरातून प्रवास कसा होतो?
लाडज गावाच्या सभोवताल वैनगंगा नदी ओसंडून वाहत असते. त्यामुळे नागरिकांना ये - जा करण्यासाठी खालील मार्ग आहेत.
- पहिला मार्ग - लाडज ते सावंगी (डोंगा प्रवास - तात्पुरता बंद )
- दुसरा मार्ग - लाडज ते चिखलगाव (डोंगा प्रवास - तात्पुरता बंद )
- तिसरा मार्ग - लाडज ते पिंपळगाव (डोंगा प्रवास - तात्पुरता बंद )