ब्रम्हपुरी: ब्रम्हपुरी तालुक्यातील पिंपळगाव भोसले येथे पुराचे पाणी दुसऱ्यांदा गावात शिरले असून, अनेक घरे पाण्याखाली गेले आहेत. शेतीत पाणी शिरल्याने गावकयांचे अति नुकसान झाले आहे. गोसीखुर्द पाणलोट क्षेत्रात सतत पाऊस पडत असल्याने गोसीखुर्द मधून वैनगंगा नदीपात्रात विसर्ग होत आहे. वैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. पिंपळगाव भोसले येथील पूरस्थितीची कडे प्रशासन दुलर्क्ष करत असलायचं चित्र दिसत आहे. कारण गावात पुराचे पाणी शिरले पण तालुका प्रशासन बघायला आलं नाही. गावात फक्त पूर वाढीच्या सूचना आणि स्वत:ची काळजी बाळगावी व सतर्क रहावे असे आवाहन पिंपळगाव भोसले ग्रामपंचायत कडून केले जात आहे.
पिंपळगाव भोसले गावात खूप पूर आहे पण या कडे प्रशासन दुलर्क्ष करीत आहे. राजकारणी सुद्धा निवडणूक असली की गावात येतात पण मागील चार दिवसापासून पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत होत आहे तरीपण या कडे प्रशासन दुलर्क्ष करीत आहे. लोक प्रतिनिधी गावातील पूरस्थितीची कडे येऊन सुद्धा पाहत नाही. या पुरामुळे अनेक शेतकऱ्यांची शेती पाण्याखाली गेल्याने शेतीचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
2020 या वर्षी आलेलं महापूर आल होत तेव्हा माननीय श्री. विजय वडेट्टीवार साहेब यांनी खूप आर्थिक मदत केली त्यांनी गावकऱ्यांसाठी आपत्कालीन बोटी आणो अन्न पुरवठा केलं होत. वडेट्टीवार साहेबांनी दोन वेळ पूरस्थितीची येऊन पाहणी केली. परंतु पण 2022 यावर्षी येथील पूरस्थिती कडे प्रशासन दुलर्क्ष करीत आहे. राखीच्या दिवशी पण पूर आल दोन दिवस राहील आहे लगेच 3 दिवसांनी पूर आल काही चे घर पडले तर काहींची घरे पाण्याखाली गेली परंतु याकडे दुलर्क्ष केलं जात आहे.
तालुका प्रशासन एवं लोक प्रतिनिधींनी पिंपळगाव भोसले येथील पूरस्थितीची पाहणी करून आणि शेतीचे पंचनामे करून तात्काळ मदत जाहीर करावी - अशी विनंती पिंपळगाव भोसले येथील नागरिकांची प्रशासनाला केली आहे.
लेखन - बातमी एक्सप्रेस आणि अविनाश कडूकर ( ग्रामस्थ - पिपंळगाव भोसले )