लाडज ते चिखलगाव डोंगा प्रवास मार्ग पूर्णपणे चौथ्यांदा तात्पुरता बंद करण्यात आलं आहे. खालच्या भागातील घरे,दुकाने आणि शेती पाण्याखाली गेली आहे. लाडज गावात चौथ्यांदा पुरपरिस्थिती उदभवली आहे.
लाडज गावात आरोग्य सुविधेचा अभाव असून लहान मुले, गरोदर स्त्रिया, वृध्द नागरिक व इतर साठी एक आपतकालीन बोट उपलब्ध करून देण्याची मागणी गावकऱ्यांनी प्रशासनाला केली आहे. परंतु प्रशासनाकडून आपत्कालीन सेवा बोट उपलब्ध करून देण्यात आली नाही आहे.
ब्रम्हपुरी तालुका मोबाइल रिपोटर अनुसार - लाडज गावातील खालील भागातील घरे आणि दुकाने पाण्याखाली गेली आहेत. शेतीत पुराचे पाणी शिरल्याने शेतीचे अति नुकसान झाले आहे. ब्रम्हपुरी तालुका प्रशासनाकडून आपत्कालीन सेवा उपलब्ध करून देण्यात आली नाही आहे. आरोग्य सुविधेचा अभाव असून लहान मुले, गरोदर स्त्रिया, वृध्द नागरिक व इतर साठी एक आपतकालीन बोट उपलब्ध करून देण्याची मागणी गावकऱ्यांनी प्रशासनाला केली आहे.
तालुका प्रशासन एवं लोक प्रतिनिधींनी लाडज येथील पूरस्थितीची पाहणी करून आणि शेतीचे पंचनामे करून तात्काळ मदत जाहीर करावी - अशी विनंती लाडज येथील नागरिकांची प्रशासनाला केली आहे.