गोंडपिपरी : आई वडीलांसोबत भेटी-गाठी करिता नातेवाइकाकडे आलेल्या तीन वर्षीय चिमुकलीचा (Three-year-old small girl) पुलाखाली पाण्याच्या प्रवाहात अडकून मृत्यू झाला. ही घटना १० जुलैला रविवारी गोंडपिपरी तालुक्यातील (Gondpipri) विठ्ठलवाडा (Vitthalwada) येथे घडली. मृतक चिमुकलीचे नाव सानू मंगेश चुनारकर ३ वर्ष असून मूल तालुक्यातील (Mul) चिमडा (chimada) येथील रहिवाशी होती.
गोंडपीपरी तालुक्यातील विठ्ठलवाडा येथे नातेवाइकाकडे तीन दिवसांपूर्वी आली होती. तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू असल्याने ती आई सोबत विठ्ठलवाडा येथे नातेवाइकाकडे थांबली. मुसळधार पावसाने नदी, नाले, छोटे पूल पाण्याने तुडुंब भरून वाहत आहेत. अश्यातच रविवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घरासमोरील नालीत पाय घसरून ती पडली. नाली तुडुंब भरून वाहत असल्याने पाण्याच्या प्रवाहाबरोबर नालीलगत असलेल्या पुलात जाऊन अडकली.
तिला वाचविण्यासाठी दोन युवक नालीत उतरले आणि तिला पुलातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र ती पाण्याच्या प्रवाहात वाहुन गेली आणि पुलाखाली अडकली. दहा ते पंधरा मिनिटचा वेळ निघून गेला. मात्र, ती चिमुकली पुलाच्या बाहेर न पडल्याने यातच तिचा मृत्यू झाला. पाण्याबाहेर काढल्यावर तिला लागलीच ग्रामीण रुग्णालय गोंडपीपरी येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले.