नवी दिल्लीः जगभरात कोरोना महामारी मागोमाग आता मंकीपॉक्स विषाणूचा (Monkeypox Virus) उद्रेक होताना दिसत आहे. भारतातही मंकीपॉक्स रुग्णांची संख्या हळूहळू वाढू लागली आहे. आता मंकीपॉक्स विषाणू संसर्ग पसरताना दिसत आहे. देशाची राजधानी दिल्लीमध्ये मंकीपॉक्स विषाणूचा पहिला रुग्ण आढळला आहे. त्यामुळे आतापर्यंत देशात या रोगाचे चार रुग्ण झालेत. यामुळे आता आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भात अधिकृत माहिती देत, दिल्लीमध्ये मंकीपॉक्सचा शिरकाव झाल्याचं स्पष्ट केलं आहे. दिल्लीमध्ये एका रुग्णाला मंकीपॉक्सची लागण झाल्याचं आरोग्य मंत्रालयाने सांगितलं आहे. दिल्लीमध्ये 31 वर्षीय इसमाला मंकीपॉक्सची लागण झाली आहे. हा रुग्ण पश्चिम दिल्लीतील रहिवासी असून, त्याला मौलाना आझाद मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.
जगात वाढत असलेल्या रुग्णसंख्येमुळे जागतिक आरोग्य संघटनेने सार्वजनिक आरोग्य आणीबाणी जाहीर केली आहे. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाच्या व्यक्तीच्या थेट संपर्कातून दुसऱ्या व्यक्तीला या रोगाची लागण होत आहे. त्यामुळे जगभरात दक्षता घेण्यात येत आहे. जगभरातील 75 राष्ट्रांमध्ये या रोगाचा प्रसार झाला आहे. आतापर्यंत 16 हजार रुग्ण आढळून आले. तर पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेकडून देण्यात आली.
मंकीपॉक्स ‘सार्वजनिक आरोग्य आणीबाणी’ घोषित
जगभरात मंकीपॉक्स विषाणूचा वाढता संसर्ग पाहता जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organization) मंकीपाक्सला सार्वजनिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यानंतर भारतातील मंकीपॉक्सचे रुग्णही वाढताना दिसत आहेत. जगातील वाढता मंकीपॉक्सचा संसर्ग पाहता जागतिक आरोग्य संघटनेकडून सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस रिसोर्सेस गेब्रेयसस (Tedros Adhanom Ghebreyesus) यांनी यावर चिंता व्यक्त केली आहे.
देशातील मंकीपॉक्सच्या रुग्णांची संख्या चार
भारतात आतापर्यंत चार रुग्णांना मंकीपॉक्स विषाणूची लागण झाली आहे. दिल्लीत नव्याने आढळेल्या रुग्णाआधी भारतात तीन रुग्णांची नोंद झाली होती. याआधी आढळलेले मंकीपॉक्सचे तीनही रुग्ण केरळमधील आहेत. या बाधित रुग्णांवर उपचार सुरु आहे.