ब्रह्मपुरी: विदर्भातील चंद्रपूर, भंडारा , आणि गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सतत मुसळधार पाऊस पडल्यामुळे नदीआणि नाले प्रचंड वेगाने दुताडी भरून वाहत आहेत. त्यामुळे या जिल्ह्यातील सर्वत्र सामान्य नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द धरणातून 13 जुलै 2022 रोजी रात्री सुमारे 12 हजार क्युसेक विसर्ग वैनगंगा नदी पात्रामध्ये सोडण्यात येणार आहे.
सूचना प्राप्त झाल्यामुळे स्थानिक प्रशासनाचे आदेशानुसार गावागावात दवंडी देऊन सतर्क राहण्याचा इशारा वैनगंगा नदी काटा लागतील गावातील नागरिकांना देण्यात आला आहे याबाबत स्थानिक प्रशासनातर्फे सर्व ग्राविअ /ग्रामसेवक तथा तलाठी यांच्यासह ग्रामपंचायतीना कळविण्यात आले.
लाडज हे गाव चारही बाजूने वैनगंगा नदीने वेढलेले आहे. लाडज गावं पुन्हा एकदा पुराच्या विरोळ्यात गेलं आहे. त्यामुळे लाडज गावाचा ये - जा संपर्क तात्पुरता बंद करण्यात आलं आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील एकमेव असं गाव जे म्हणजे लाडज कारण या गावाला नेहमी बेटाचे स्वरूप प्राप्त होते. सदर गावाच्या भोवताल महापूर होत असल्यामुळे त्या गावासाठी आता धोक्याची घंटा आहे. सन 2004-05 आणि 2015-2016 मध्ये पाण्यात बुडून अनेकांना आपलं जीव गमवावा लागला.
त्यामुळे स्थानिक प्रशासन जास्त रिक्स घ्यायला तयार नाही शिवाय ज्यांच्याकडे डोंगे आहेत अशा व्यक्तींना जास्त प्रवाहात डोंगे टाकण्यास स्थानिक प्रशासनाकडून मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे लाडज गावातील एखाद्या व्यक्तीला दवाखाना किंवा इमर्जन्सी शेड्युलमध्ये गरज पडल्यास त्यांना पर्याय नाही त्यामुळे स्थानिक प्रशासनाने लाडस गावाच्या संपर्काशत राहावे अशी विनंती प्रशासनाला गावकऱ्यांनी केली आहे.
नदी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होऊन ब्रह्मपुरी, मूल, सावली, पोंभुर्णा व गोंडपिपरी तालुक्यातील नदीलगतच्या गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. करिता नदीलगतच्या गावकऱ्यांनी काळजी घ्यावी, असा सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.