Gosikhurd Flood Live 2022: गोसीखुर्द प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सतत मुसळधार पाऊस पडत असल्याने व पाण्याची आवक वाढल्याने धरणाची पाणी पातळी कायम राखण्यासाठी गोसे धरणातून पाण्याचा विसर्ग टप्याटप्याने वाढविण्यात येत आहे. गोसेखुर्द धरणाचे पुन्हा सर्व 33 दरवाजे ( Gosikhurd Dam Open 33 Gates) उघडण्यात आले असून सर्व दरवाज्यातून 5000 क्युमेक्स ( five-thousand-cumex-water ) पाण्याचा विसर्ग वैनगंगा नदीपात्रात सोडण्यात आलं आहे. तरी नदी पात्रात ये जा करणाऱ्यांनी काळजी घ्यावी .
- गोसेखुर्द गेट सुरु - 33 (22.19%)
गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस पडत असल्याने पेंच प्रकल्पाचे द्वार उघडले आहे. कन्हान नदीवरील वाढ़त असलेल्या विसर्गामुळे पुढील काही तासात धरणाचा विसर्ग 3000 ते 5000 क्युमेक्स पर्यंत टप्प्याटप्प्याने वाढविण्यात येईल. यामुळे गोसीखुर्द धरण क्षेत्रा खालील वैनगंगा नदी ओसंडून वाहत आहे. तरी नदीपात्राजवळील गावांना तसेच नदीपात्रामधुन आवा-गमन करणा-या सर्व संबंधीतांनी स्वत:ची काळजी बाळगावी प्रकल्प प्रशासनाकडून सुचित करण्यात आले आहे.