ब्रम्हपुरी : तालुक्यातील लाडज हे गाव चारही बाजूने वैनगंगा नदीने वेढलेले आहे. लाडज गावं पुन्हा एकदा पुराच्या विरोळ्यात गेलं आहे. त्यामुळे लाडज गावाचा ये - जा संपर्क तात्पुरता बंद करण्यात आलं आहे. ब्रम्हपुरी तालुक्यातील एकमेव असं गाव जे म्हणजे लाडज कारण या गावाला नेहमी बेटाचे स्वरूप प्राप्त होते. सदर गावाच्या भोवताल महापूर होत असल्यामुळे त्या गावासाठी आता धोक्याची घंटा आहे.
वैनगंगा नदीपात्रात दरवर्षी महापूरच्या आगममुळे जीवितहानी होते. सन 2004-05 आणि 2015-2016 मध्ये पाण्यात बुडून अनेकांना आपलं जीव गमवावा लागला. सन 2020 मध्ये 1994 पेक्षाही मोठं महापूर आलं होत. लाडज गावातील संपूर्ण घरे पुराच्या पाण्याखाली बुडालेली होती.
त्यामुळे स्थानिक प्रशासन जास्त रिक्स घ्यायला तयार नाही शिवाय ज्यांच्याकडे डोंगे आहेत अशा व्यक्तींना जास्त प्रवाहात डोंगे टाकण्यास स्थानिक प्रशासनाकडून मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे लाडज गावातील एखाद्या व्यक्तीला दवाखाना किंवा इमर्जन्सी शेड्युलमध्ये गरज पडल्यास त्यांना पर्याय नाही त्यामुळे स्थानिक प्रशासनाने लाडस गावाच्या संपर्काशत राहावे अशी विनंती प्रशासनाला गावकऱ्यांनी केली आहे.