चंद्रपूर: चालकाचं नियंत्रण सुटलं, शेतमजुरांना घेऊन जाणारा पिकअप उलटला ; 43 शेतमजुर जखमी - #BatmiExpress

Chandrapur,Chandrapur Accident,Chandrapur Accident News,Chandrapur Live,Chandrapur News,Chandrapur News Live,Accident,Accident News,Chimur,

Chandrapur,Chandrapur Accident,Chandrapur Accident News,Chandrapur Live,Chandrapur News,Chandrapur News Live,Accident,Accident News,Chimur,

चंद्रपूर
: शेतमजूराना घेऊन निघालेले पिकअप वाहन उलटले. यात 43 मजूर जखमी झाले आहेत. ही घटना चिमूर तालुक्यातील गोदेंडा-खांबाळा मार्गावर आज घडली. या घटनेत सूदैवाने जिवीतहाणी झालेली नाही. जखमींना उपचारासाठी रूग्णालयात हलविण्यात आले आहे.जिल्ह्यात जोरदार पाऊस सूरू आहे.त्यामुळे शेतीच्या कामाला गती आली आहे.

मजूरांची कमतरता असल्याने पिकअप, ऑटोने मजूरांना शेतात नेल्या जात आहे. चिमूर तालुक्यातील येरखडा येथील पिकअप वाहनाने केवाडा गावातील शेतमजुर गोंदेडा -खांबाडा मार्गावरील मनोज वाघे यांचा शेताकडे घेऊन जात असातांना पिकअप वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला वाहन उलटले. या वाहनात 43 मजूर होते. अपघात होताच आसपासचे शेतकरी, शेतमजुर धावून गेलेत.

वाहनात दबलेल्या जखमींना त्यांनी बाहेर काढले. जखमींना उपचाराकरीता प्राथमिक आरोग्य केंद्र नेरी येथे हलविण्यात आले आहे. या अपघातात 19 शेतमजुर गंभीर जखमी झालेत तर 24 शेतमजूर किरकोड जखमी झाले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.