नागभीड : दिनांक 20/06/2022 रोज रविवारला राष्ट्रवादी कांग्रेस नागभीड शहर अध्यक्ष रियाज शेख यांच्या नेतृत्वात नागभीड येथे राष्ट्रवादी कांग्रेसचे जिल्हा अध्यक्ष मा.राजेंद्रजी वैद्य चिमूर विधान सभा अध्यक्ष डॉ. रघुनाथजी बोरकर यांच्या हस्ते कार्यलयाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी चंद्रपुर जिल्हा ओबीसी कार्यध्यक्ष मा. बंडूजी डाखरे, जिल्हा उपाध्यक्ष नासिरभाई शेख, जिल्हा संघटक भाऊरावजी डांगे, तालुका अध्यक्ष विनोदभाऊ नवघडे,युवक विधानसभा अध्यक्ष प्रशांत घूमे,महिला तालुका अध्यक्ष निर्मलाताई रेवतक़र उपस्थित होते.
हे सुद्धा वाचा
नंतर जिल्हा अध्यक्ष राजेंद्रजी वैद्य, विधानसभा अध्यक्ष डॉ. रघुनाथजी बोरकर यांच्या नेतृत्वात शहर अध्यक्ष रियाज शेख युवक शहर अध्यक्ष शाहरुख शफी शेख युवक कार्याध्यक्ष सचिन बनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नागभीड क्षेत्रातिल प्रत्येक प्रभागातिल बुतवाइस आढ़ावा बैठक घेण्यात आली.
यावेळी महिला शहर अध्यक्ष वनिताताई सोनकुसरे, ओबीसी तालुका अध्यक्ष दिनेश समर्थ, ज्येष्ठ नेते रामभाऊ शहाणे,श्रीराम सहारे, सुरेश ढोले, संदीप डांगे,शांताराम रंधय तसेच जीतूचौधरी, बनकर, अनवर पठान गणेश कुम्भरे,प्रत्येक प्रभागातिल बूथ अध्यक्ष उपस्थित होते.