इयत्ता 10वीचा निकाल आज 17 जूनला दुपारी 1 वाजता ऑनलाइन जाहीर |
SSC 10th Result 2022 Live: महाराष्ट्र राज्यातील इयत्ता 10वीच्या बोर्डाची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचा आज (17 जूनला ) 10वीचा निकाल (SSC Result 2022 Live) लागणार असल्याचे राज्याचे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (School Education Minister Varsha Gaikwad) यांनी सांगितले आहे. त्यामुळे दहावीच्या लाखो विद्यार्थ्यांना आता निकालाची उत्सुकता लागून राहिली आहे. इयत्ता 10वीचा निकाल आज ऑनलाईन (Online SSC Result) पद्धतीने लागणार असून विद्यार्थ्यांना आणि पालकांना तो अधिकृत वेबसाईट वर पाहता येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे त्यांना आता examhelper.batmiexpress.com यावरही सहजपणे आपला निकाल पाहता येणार आहे.
SSC Result 2022 Live - 10वीचा निकाल तपासण्यासाठी खालील वेबसाइट:
SSC Result 2022 Live - महाराष्ट्र बोर्डाचा एसएससी निकाल कसा तपासणार?
- mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या
- महाराष्ट्र एसएससी निकाल 2022 या लिंकवर क्लिक करा
- तुमचा रोल नंबर आणि इतर तपशील प्रविष्ट करा
- तपशील सबमिट करा आणि तुमचा निकाल ( SSC Result 2022 ) तपासा.
- महाराष्ट्र ( SSC Result 2022 ) बोर्डाचा निकाल 2022 स्क्रीनवर प्रदर्शित होईल
- भविष्यातील वापरासाठी परिणाम पृष्ठाची प्रिंटआउट घ्या.
SSC Result 2022 - एवढ्या विद्यार्थ्यांनी दाखले केला होता अर्ज:
या वर्षीची महाराष्ट्रातील दहावीच्या विद्यार्थ्यांची मार्च आणि एप्रिल महिन्यात परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेला 16,38,964 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज दाखल केला होता. मात्र त्यापैकी 8,89,505 मुले तर 7,49,458 मुलींनी दहावीची परीक्षा दिली होती.
SSC Result 2022 - आज दुपारी 1 वाजता निकाल ऑनलाइन जाहीर होणार:
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) कडून आज 17 जून रोजी दुपारी 1 वाजता दहावीचा निकाल ऑनलाइन जाहीर (SSC Result 2022) होणार आहे.
लाखो विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आजच्या निकालामुळे संपणार:
महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आजच्या निकालामुळे आता संपणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (MSBSHSE) आज 17 जूनला रोजी दुपारी 1 वाजता दहावीचा निकाल (SSC Result 2022 ) ऑनलाईन जाहीर केला जाणार आहे. विद्यार्थ्यांचे निकाल अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in आणि mahahsscboard.in वर प्रसिद्ध केला जाणार आहे. या परिस्थितीत या वर्षी महाराष्ट्र बोर्डाच्या एसएससी परीक्षेत (SSC Exam Resut 2022) बसलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांचे प्रवेशपत्र घेऊन तयार राहण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. निकाल जाहीर होताच, रोल नंबर, आईचे नाव आणि जन्मतारीख यांच्या मदतीने निकाल (Maharashtra SSC Result 2022) या अधिकृत वेबसाइटवर पाहता येणार आहे. महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट व्यतिरिक्त, तुम्ही प्रथम बातमी एक्सप्रेस च्या एक्साम हेल्पर वर निकाल पाहू शकणार आहात. महाराष्ट्र बोर्डाच्या एसएससी निकालाच्या लाइव्ह अपडेटसाठी बातमी एक्सप्रेस पोर्टलच्या संपर्कात रहा.