Maharashtra SSC 10th Result 2022: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) बुधवारी १५ जूनला इयत्ता 10वीच्या बोर्ड परीक्षेचा निकाल पूर्वी अपेक्षेप्रमाणे जाहीर करणार नाही. वृत्तानुसार, राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड लवकरच इयत्ता 10वीच्या निकालाची नवीन तारीख जाहीर करतील.
यावर्षी सुमारे 20 लाख विद्यार्थ्यांनी जूनमध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र एसएससी परीक्षेला बसले होते. साधारणपणे बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर एक ते दोन आठवड्यांनंतर महाराष्ट्र बोर्डाकडून निकाल जाहीर केले जातात. बोर्डाने उत्तरपत्रिका तपासणीची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे. निकाल जाहीर झाल्यावर mahresult.nic.in वर प्रसिद्ध केले जातील.
इयत्ता 10वीच्या बोर्ड परीक्षेचा निकाल पूर्वी अपेक्षेप्रमाणे होणार असे लाखो विद्यार्थाना वाटलं होत. आज 15 जूनला इयत्ता 10वीच्या बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर होणार नाही आहे. मात्र, निकालाची तारीख निश्चित झाली नाही. आता 20 जूनपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र, अधिकाऱ्यांनी याची पुष्टी करण्यास नकार दिला.