कोरोना रूग्ण संख्या वाढत असल्याने केंद्रिय आरोग्य विभागाने राज्य सरकारला पत्र पाठवले आहे. मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे पुणे रायगड,पालघर या जिल्ह्यातील रुग्णसंख्या चिंतेची बाब आहे, असे पत्रात नमूद केलेय.
- मुंबई
- मुंबई उपनगर
- ठाणे
- पुणे
- रायगड
- पालघर
या जिल्ह्यात टेस्टिंग, लसीकरण वाढवणे यावर अधिक भर द्यावा. तसेच नवीन कोरोना व्हेरियंट यावर लक्ष द्यावे, असेही सांगण्यात आलेय.
राज्यात मागील काही दिवसांपासून मुंबईतील कोरोना रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळेच टास्क फोर्स पुन्हा एकदा कार्यरत झालेय. सध्या जे रुग्ण आढळतात त्यातील बहुतांश रुग्ण हे माईल्ड आहेत. आता नव्याने वाढणारी रुग्ण संख्या कमी करायची असेल तर मास्क वापरायलाच हवा.
ज्या ठिकाणी बंदिस्त ठिकाणे आहेत, तिथे गर्दी असेल, जसे की ऑफिस, सभागृह येथे मास्क वापरणे आवश्यक आहे.
शिवाय, कोरोनाची वाढत्या रुग्णसंख्या बघता वयोवृद्ध, हाय रिस्क पेशंट, डायलिसिस वरील पेशंट यांनी विशेष काळजी घेतली पाहिजे