सिंदेवाही : वनपरिक्षेञा अंतर्गत येणाऱ्या मरेगाव (तुकुम) येथे विज कोसळल्याने त्यात तीन चितळ ठार झाल्याची माहिती आली आहे. १७ जून च्या रात्री आलेल्या पाऊसा दरम्यान सिंदेवाही वनपरिक्षेञातील मरेगाव (तुकुम) येथील तलाव परिसरात अंदाजे रात्रो १२ वाजता च्या सुमारास विज पडली त्यात तीन चीतळ जागीच ठार झाले. १८ जून च्या सकाळी मृत अवस्थेत तीन चीतळ काही नागरिकांना दिसुन आले. त्यांनी याची माहिती माजी सरपंच सहारे यांना दिली व त्यांच्या सहाय्याने वनविभागाला दिली त्या आधारे वनविभागाने घटनेच्या ठिकाणी पोहचुन पंचनामा केला व मृत पावलेल्या तिन्ही चीतळ हे मादी आहेत."
हि माहिती कळताच वनपरिक्षत्र अधिकारी विशाल सालकर, क्षत्रे सहायक बुराडे, वनरक्षक गेडाम, पशुवद्यकीय अधिकारी पूजा हिवरकर सिंदेवाही यांनी घटना स्थळ गाठून पंचनामा केला. पुढील तपास वनविभाग करीत आहे.