![]() |
कर्मवीर कन्नमवार कनिष्ठ महाविद्यालय सुरबोडी 10वीचा निकाल 100 टक्के |
ब्रम्हपुरी - सुरबोडी: कर्मवीर कन्नमवार विद्यालय सुरबोडी येथील उत्कृष्ठ निकालाची परंपरा कायम नुकताच इयत्ता 10 वीचा निकाल जाहीर झाला यात कर्मवीर कन्नमवार हायस्कूल सुरबोडी चां निकाल 100% टक्के लागला असून विद्यालयातून प्रियांशू ताराचंद मेश्राम हा 84% टक्के घेऊन प्रथम ,कुमारी मित्तल वैजनाथ बगमारे 82% घेऊन द्वितीय, तर वैभव पांडुरंग ढोंगे 81% घेऊन तृतीय आला.
- प्रियांशू ताराचंद मेश्राम 84%
- कुमारी मित्तल वैजनाथ बगमारे 82%
- वैभव पांडुरंग ढोंगे 81%
या सर्व गुणांकन प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचं व त्यांच्या पालकांचं घरी जाऊन विद्यालयाचे मुख्यध्यापक श्री पिलारे सर तथा सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी पुष्पगुच्छ व मिठाई देऊन अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या.
विशेष बाब म्हणजे या वर्षी विद्यालयाचा 10वी आणि 12 वी चां निकाल हा 100% लागला असून दोन्ही निकालात सावलगाव येथील इयत्ता 12 वी मधून प्रथम आणि द्वितीय दोन विद्यार्थी गुणांकन घेऊन प्रथम आले तर इयत्ता 10 वी मधून प्रथम , द्वितीय , आणि तृतीय ,चतुर्थ असे गुणांकन प्राप्त केलेले चारही विद्यार्थी हे सावलगाव येथीलच असल्यामुळे गावातील प्रथम नागरिक तथा ग्रा. प. सर्व सदस्य ,तंटा मुक्त समितीचे अध्यक्ष तथा सर्व सदस्यांनी विद्यार्थ्यांचं खूप अभिनंदन केले. आणि विद्यालयाप्रती कृतज्ञता व्यक्त केली.