- आरमोरी तालुक्यातील इंजेवारी वनक्षेत्रातील घटना
गडचिरोली :- सरपण गोळा करण्यासाठी गावालगत जंगल परिसरात गेलेल्या इसमावर अचानक वाघाने हल्ला करून ठार केल्याची धक्कादायक घटना आज १६ जुन रोजी सकाळच्या सुमारास इंजेवारी वनक्षेत्रात घडली. या घटनेमुळे या परिक्षेत्रातील गावातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. वासुदेव मुरलीधर मेश्राम (३६) रा. इंजेवारी असे मृतकाचे नाव असल्याची माहिती प्राप्त झाली आहे . घटनेचा अधिक तपास वनविभागाकडून सुरू आहे.
तो वाघ आला ब्रम्हपूरी वनक्षेत्रातून:
इंजेवारी येथील इसमावर हल्ला केलेला वाघ ब्रम्हपूरी वनक्षेत्रातून आलेला आहे. सदर वाघ नर असून त्याला पकडयासाठी मंजूरी सुध्दा घेण्यात आली आहे. ताडोबाची एक टीम त्या सीटी 1 वाघाला पकडण्यासाठी दाखल होणार आहे, अशी माहिती वडसा वनविभागाचे उपवनसंरक्षक श्री. सालविठ्ठल यांनी दिली.
editor_ Anil bodalkar