बातमी एक्सप्रेस वृत्तसेवा, गडचिरोली:
- आरमोरी तालुक्यात वाघाच्या हल्यातील मरण सत्र सुरूच
आरमोरी तालुक्यात नरभक्षक वाघाचा धुमाकूळ सुरूच असताना आज दिनांक 29 जून ( बुधवारी ) सकाळच्या सुमारास शेतात पेरणीसाठी गेलेल्या शेतकऱ्यावर अचानक वाघाने हल्ला केला त्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाला.
सागर आबाजी वाघेरे (वय 48 ) रा. बोरीचक ता. आरमोरी जि गडचिरोली असे वाघाच्या हल्ल्यात मृत पावलेल्या दुर्दैवी शेतकऱ्याचे नाव आहे.
ऐन शेतीच्या कामाच्या हंगामात गडचिरोली, आरमोरी तालुक्यात नरभक्षी वाघाने धुमाकूळ घातल्या मुळे शेतकरी, खूप मोठ्या संकटात सापडला आहे.