दुचाकीला-टिप्परची धडक बसल्याने एकाच परिवारातील दोन युवक ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
नागभीड:- चिखल परसोडी येथे घरी लग्न असल्यामुळे लग्ना करिता सामान आणायला नागभीडला जाणार्या युवकांच्या दुचाकीला-टिप्परची धडक बसल्याने एकाच परिवारातील दोन युवक ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
सविस्तर वृत्त, असे की घरच्या लग्नाचे कार्य असल्यामुळे लग्नाच्या खरेदी करीता चिखल परसोडी वरून नागभीडला मोटारसायकल क्रमांक एम. एच.३१ बी.आर.१७४७ ने जात असताना या नागभीड कडून ब्रम्हपुरी कडे जाणाऱ्या मालवाहू टिप्पर क्रमांक एम. एच. ४० बी.जी. ५४४१ ने समोरासमोर जोरदार धडक बसल्याने भूषण शामराव बोकडे, वय २५ वर्ष, पवन विनोद बोकडे वय १७ वर्ष, हे दोन युवक जागीच ठार झाले. तर गिरीश सुधाकर बोकडे वय १८ वर्ष हा गंभीर जखमी अवस्थेत असल्याने त्याला ग्रामीण रुग्णालय नागभीड येथे दाखल करण्यात आले.
प्राथमिक उपचार करून त्याला तात्काळ नागपूरला समोरील उपचाराकरिता हलविण्यात आले असुन चालक अपघात स्थळी टिप्पर ठेवून फरार झाला आहे.
घटनास्थळी पोलिस दाखल होऊन पंचनामा करून दोन्ही शव शवविच्छेदनाकरिता ग्रामीण रुग्णालय नागभीड येथे आणण्यात आले आहे. पुढील तपास नागभीड पोलिस हे करीत आहे.