जावयाने सासऱ्याला धक्का दिल्याने त्यांचा कालव्यात बुडुन मृत्यू झाला आहे. यावेळी आपल्या मोठ्या भावाचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी लहान भावाने कालव्यात धाव घेतली असता त्यांचासुद्धा पाण्यात बुड़न मृत्यू झाला आहे.
भंडारा : भंडारा येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये जावयाने सासऱ्याला धक्का दिल्याने त्यांचा कालव्यात बुडुन मृत्यू झाला आहे. यावेळी आपल्या मोठ्या भावाचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी लहान भावाने कालव्यात धाव घेतली असता त्यांचासुद्धा पाण्यात बुड़न मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपी जावयाला अटक केली आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहित.आरोपी जावयाने नेमका कोणत्या कारणामुळे आपल्या सासऱ्याची हत्या केली याचा तपास पोलीस करत आहेत.
पनवी तालुक्यातील सिंधी या ठिकाणी हि दुर्दैवी घटना घडली आहे. दोन्ही भावांच्या अपघाती मृत्यूमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. हरी गोविंदा नागपुरे आणि चंद्रभान गोविंदा नागपुरे अशी या दोन्ही भावांची नावे आहेत. यामध्ये हरी नागपुरे 65 तर चंद्रभान गोविंदा नागपुरे 55 वर्षांचे होते. मृत हरी यांना त्यांच्या जावयाने गोसेसच्या उजव्या कालव्याजवळ धक्का दिल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.