नागभिड:- तेंदुपत्ता संकलन करण्यासाठी गेलेल्या इसमावर वाघाने हल्ला चढवून नरडीचा घोट घेत ठार केल्याची घटना आज दिनांक:-५/५/२०२२ ला सकाळी ८:०० वाजाताच्या सुमारास खळबळ जनक घटना घडली आहे. श्री.आडकू मारोती गेडाम (वय वर्षे ५२) असे असून नवेगाव हुंडेश्वरी ता.नागभीड जिल्हा चंद्रपूर येथिल रहिवाशी आहे.
सविस्तर वृत्त असेआहे की, आडकुजी हे तेंदु पत्ता संकलन करण्यासाठी जंगलात गेले असता झुडपात दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने हल्ला करून आडकुजीच्या नरडीचा घोट घेत ठार केले.
आडकुजीच्या पछात्य पत्नी, १मुलगा,सुन,नातु,नातिन असा आप्त परीवार आहे.
आडकुजीच्या जाण्याने गेडाम कुटुंबावर मोठें संकठ कोसळले असून गेडाम कुटुंब व गाव परीसर शोकसागरात बुडालेला आहे. वाघाचे संभाव्य धोके लक्षात घेता संबधित वनविभागाने नरभक्षक वाघाला त्वरित जेरबंद करावे. तसेच गेडाम परिवाराला आथिर्क मदत द्यावी अशी मागणी गावपरिसरातून होत आहे.