यवतमाळ : मानसिक त्रासाला कंटाळून तरुणाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या घटना घडली आहे. ही घटना १३ एप्रिलला दुपारी ३ वाजताच्या सुमारास वाघाडी येथील सतीश जयपुरिया यांच्या शेतातील विहिरीत घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी महिलेसह एका आरोपी विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. सोहेल खान ( वय २९ ) रा. ताज बाग मज्जीद जवळ यवतमाळ असे आत्महत्या करणाऱ्या मृत तरुणाचे नाव आहे.
या घटनेनंतर हुमा खान दिलावर खान (वय २०) वर्ष रा. ताजबाग मज्जीद जवळ यवतमाळ यांनी अवधूत वाडी पोलिस ठाणे येथे या घडलेल्या प्रकरणाची रितसर तक्रार नोंदविली आहे. त्यावरुन पोलिसांनी आरोपी मीना विनोद मेश्राम (३५) रा. वाघाडी या महिलेविरोधात तसेच, सागर भाऊराव शिंदे रा. भारत नगर, यवतमाळ यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच, पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहे.