छत्तीसगड मधील बालोद जिल्ह्यात एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून आत्महत्या केली. यासोबतच तरुणाने आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडिओही बनवला आणि तो व्हॉट्सअॅप स्टेटसवर अपलोड केला. हा प्रकरण पाररास भागातील आहे. आत्महत्या करण्यापूर्वी तरुणाने आपल्या खोलीत लिहिले होते की, माझं मृत्यू हा प्रेयसीसाठी माझ्याकडून लग्नाची भेट आहे.
पोलिसांनी सांगितले की, तरुणाने कोळशाच्या साहाय्याने भिंतीवर लिहिले होते,"मेरी मौत तेरी शादी का गिफ्ट, आई लव यू''. त्यानंतर तरुणाने गळ्यात फास टाकत व्हिडिओ बनवला. तो बनविलेला व्हिडीओ Whatsapp स्टेटस वर शेअर केले. त्यानंतर पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. वास्तविक, तरुणाचे एका तरुणीवर एकतर्फी प्रेम होते. मुलीचे लग्न ठरले होते, त्यामुळे तरुण खूप दुखावला होता.
बालोदचे डीएसपी प्रतीक चतुर्वेदी यांनी सांगितले की, मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. यासोबतच व्हिडिओचीही चौकशी सुरू आहे. पुढील कार्यवाही चालू आहे.