नागपूर : शहरात दुपारच्या सुमारास तरुणींमध्ये भररस्त्यात तुंबळ हाणामारी झाली. एकमेकींचे केस ओढण्यापासून तर शिवीगाळ करत चांगलीच झटापट झाली. या घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावर सध्या जोरदार व्हायरल होत आहे.
ही घटना सिव्हील लाईन परिसरात असलेल्या हिस्लॉप कॉलेजजवळची आहे. दुपारच्या वेळेस रस्त्याकडेला उभा असलेल्या या ६-७ तरुणींमध्ये अचानक भांडण सुरू झाले नंतर त्या वादाचे हाणामारीत रुपांतर झाले.भर-रस्त्यात या ६-७ तरुणी एकमेकींचे केस ओढत मारहाण करू लागल्या. यावेळी रस्त्यावर गर्दी जमली होती. दरम्यान, कुणीतरी त्याचा व्हीडिओ शूट करून तो सोशल मीडियावर टाकला.या हाणामारीचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही. सध्या या घटनेसंदर्भात कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही. मात्र, हा व्हीडिओ समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ-
नागपुरात महाविद्यालयीन युवतींमध्ये फ्रिस्टाईल. pic.twitter.com/X7vfWVpFTG
— Govind Hatwar (@GovindHatwar) April 12, 2022