बिहार : एकदा केलेली मैत्री आपण आयुष्यभर टिकवतो. असं आपण अनेकदा म्हणतो. मैत्रीसाठी काहीही कारयला तयार होतो. पण हे खरंखुर करुण दाखवलंय औरंगाबाद इथल्या मैत्रींणीनी. आपल्या मैत्रीणीला तिच्या प्रियकरानं दिलेला नकार सहन न झाल्याने त्या मुलीसह ६ मैत्रीणींनी आत्मह्त्येचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेत तिन जणींचा मृत्यू झाला असून उर्वरित तीन मैत्रिणींची तब्येत गंभीर आहे. बिहारच्या औरंगाबादमधील कासमा भागात ही घटना उघडकीस आली आहे.
एसपी कांतेश कुमार मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित तरुणीला तिच्या भावाचा मेहुणा म्हणजेच वहिनीचा भाऊ आवडत होता. त्याला प्रपोज करण्यासाठी ती आपल्या पाच मैत्रिणींना सोबत घेऊन गेली. मैत्रिणींसमोरच तिने आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या. आपल्याशी लग्न करण्याचा प्रस्तावही तिने तरुणासमोर मांडला.
नेमकं काय घडलं?प्रियकराने मात्र तरुणीशी लग्न करण्यास साफ नकार दिला आणि तो निघून गेला. नकार ऐकून हिरमुसलेल्या सहा जणी गावी परत आल्या. नाराज झालेल्या प्रेयसीने आधी विष प्यायले. आपल्या मैत्रिणीने टोकाचं पाऊल उचलल्याचं पाहून उर्वरित पाच जणींनीही तिची साथ देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर एका मागून एक पाचही मैत्रिणींनी विषप्राशन केले. त्यांनतर तिन जणींचा मृत्यू झाला तर, तिघींवर उपचार सुरू आहे. सध्या तीन मुलींची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर मगध मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरु आहेत.