कोरपना:- मोबाईल फोनवर बोलता असताना तोल गेल्याने तिसऱ्या मजल्यावरून पडून एका (वय 35) इसमाचा मृत्यू झाल्याची घटना कोरपना तालुक्यातील नांदाफाटा येथे प्रभाव क्रमांक 5 मध्ये उघडकीस आली. जोगदंड बबलू मेश्रारम असे मृताचे नाव आहे. या घटनेनंतर गडचांदूर पोलिसांनी नारिकांना मोबाईलवर बोलताना सावधानत बाळगण्याचे आवाहन केले आहे.
Read Also: देसाईगंज: चोप येथे धान पिकात शेतकऱ्याचा मृतदेह आढळला
कोरपना तालुक्यातील गडचांदूरला लागून असलेल्या नांदाफाटा येथे प्रभाव क्रमांक 5 मध्ये अंजू सेठ यांच्या इमारतीमध्ये जोगदंड मेश्राम हे भाड्याच्या घरात राहत होते. ते अल्ट्राटेक सिमेंट कंपनीमध्ये ऑरेंज सिटी या कंत्राटदाराकडे सुपरवायझर म्हणून कार्यरत होते. मंगळवार (5 एप्रिल) रोजी रात्री ते कामावरून घरी आले. साडेअकरा वाजण्याच्या सुमारास त्यांना मोबाईलवर कुणाचा तरी कॉल आला. यावेळी ते मोबाईलवर बोलत असताना तिसऱ्या मजल्यावरून त्यांचा तोल गेल्याने ते सरळ तिसऱ्या मजल्यावरून थेट खाली पडले. उंचारून खाली पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी व 6 वर्षांची मुलगी आहे.
सदर घटनेची माहिती गडचांदूर पोलिस ठाण्याचे ठाणेदार सत्यजित आमले यांना देण्यात आली. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीला पाठविला. मोबाईलवर बोलताना सावधानता न बाळगल्याने एका इसमाचा मृत्यू झाल्याने सर्वत्र शोककळा पसरली आहे.