गोंडवाना विद्यापीठाच्या उन्हाळी २०२२ परीक्षा ऑफलाईन; MCQ OMR पद्धतीने होणार |
- उन्हाळी २०२२ परीक्षा १ जून पासून सुरू
गोंडवाना विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील सर्व प्राचार्य, पदव्युत्तर विभागप्रमुख विद्यार्थी तथा संबंधितांना कळविण्यात येते की, विद्यापीठाच्या शैक्षणीक सत्र २०२१-२२ मधील दि. ०९/०२/२०२२ रोजीपर्यंत संपन्न झालेल्या हिवाळी २०२१ च्या परीक्षेतील सर्व विद्यार्थ्यांच्या उन्हाळी-२०२२ च्या लेखी परीक्षा दि. ०१/०६/२०२२ रोजी पासून संबंधित अभ्यासक्रमाच्या वेळापत्रकानुसार ऑफलाईन (MCQ) व ओएमआर (OMR) (बहुपर्यायी प्रश्न) पध्दतीनुसार घेण्याचे ठरविण्यात आलेले आहे.
परीक्षेकरिता लागणारी प्रश्नपत्रिका तसेच OMR उत्तरपत्रिका प्रत्येक परीक्षा केंद्रावर विद्यापीठाद्वारे पोहचविण्यात येईल. विद्यार्थ्याना सदर प्रश्नपत्रिका सोडविण्याकरिता संबंधित अभ्यासक्रमाच्या वेळापत्रकानुसार एकुण एक तासाचा अवधी देण्यात येईल. प्रश्न पत्रिकेत एकुण ५० बहुपर्यायी प्रश्न असतील व प्रत्येक प्रश्नाला १ गुण याप्रमाणे एकुण ५० गुणाचा पेपर असेल. चुक प्रश्नासाठी कोणतेही Negetive mark नसतील.
अधिकृत घोषणा पत्र |
सदर परीक्षेतील प्राप्त गुण संबंधीत अभ्यासक्रमाच्या परीक्षा योजनेनुसार परावर्तीत करण्यात येईल. परीक्षा संचालीत करण्याकरिता सर्व परीक्षा केंद्रांना येणारा खर्च विद्यापीठाच्या प्रचलीत नियमानुसार देण्यात येईल. या परीक्षेचे वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर लवकरच प्रकाशित करण्यात येईल, याची संबंधितांनी नोंद घ्यावी. यासंबंधात प्राचार्यांनी परीक्षेबाबत होणारी कार्यवाही सर्व विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आणून देण्याकरीता महाविद्यालय स्तरावर नियोजन करावे.