गडचिरोली: युवतीने तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील गोगाव येथे घडली. आत्महत्या करणाऱ्या युवतीचे नाव समृद्धी भीमराव उंदीरवाडे (१७) असे आहे.
समृद्धी ही मागील दोन दिवसांपासून बेपत्ता (missing) होती. तिच्या नातेवाईकांनी तिचा शोध घेतला मात्र ती आढळून आली नाही. २३ एप्रिल रोजी तिचा मृतदेह गावाच्या जवळील असलेल्या तलावात तरंगताना आढळून आला. गावकऱ्यांनी मृतदेह बाहेर काढला. आत्महत्येचे नेमके कारण काय असू शकते हे अद्याप कळू शकले नाही.