रामटेक गुडा गावांमध्ये सामान्य जनतेला पिण्याचे पाणी आणण्यासाठी दररोज ०१ किलोमीटर अंतरावर जाऊन डोक्यावर पाणी आणावे लागते, व गुरा-ढोरांना सुद्धा पाणी डोक्यावर आणून पाजावे लागते.
जिवती:- असापुर ग्रामपंचायत मधील रामटेक गुडा गड पांढरवणी हे गाव २२ वर्षांपासून वसलेला आहे या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव वास्तव्यास आहे तरी या गावांमध्ये लोकप्रतिनिधीनी आणि प्रशासनाचा दुर्लक्ष होत आहे.
कारण या गावांमध्ये सामान्य जनतेला पिण्याचे पाणी आणण्यासाठी दररोज ०१ किलोमीटर अंतरावर जाऊन डोक्यावर पाणी आणावे लागते, व गुरा-ढोरांना सुद्धा पाणी डोक्यावर आणून पाजावे लागते, या संबंधी समस्येचे निराकरण व्हावे म्हणून समस्त गावकरी मंडळी अनेकदा गट विकास अधिकारी यांना भेट देऊन आपल्या गावाची समस्या सांगितली तरी आतापर्यंत गट विकास अधिकारी यांनी रामटेक गुडा येथील पाण्याची समस्या सोडविली नाही.
याकरिता आदिवासी बांधव "जगावे किंवा मरावे" असा प्रश्न जर गावातील जनतेला पडत आहे तर या समस्येचे तात्काळ निवारण करावे अन्यथा गावातील मंडळी व जय विदर्भ पार्टी आमरण उपोषणाला बसेल असे सुदामभाऊ राठोड यांनी सांगितले. येत्या सात दिवसात प्रशासनांनी टँकरची सोय करून देण्यात यावी.