बारावीच्या विद्यार्थिनीची कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या
सालेकसा ( Gondia News ): तालुक्यातील रामपूर (पानगाव) येथील बारावीच्या विद्यार्थ्यांनीने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना ४ मार्च रोजी घडली. गीता गुलाब बिसेन (वय १८) असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थिनीचे नाव आहे.
महाशिवरात्रीच्या दिवशी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास गीताने धानावर फवारणी केले जाणारे पेन्डाल हे कीटकनाशक प्राशन केले. कीटकनाशक प्राशन केल्यानंतर तिने घरच्या लेाकांना विष घेतल्याचे सांगितले. त्यानंतर तिला तिच्या कुटुंबियांनी त्वरित आमगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले. मात्र, तिची प्रकृती चिंताजनक असल्याने तेथून तिला गोंदिया येथील केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात आयसीयूमध्ये भरती करण्यात आले. तीन दिवस गीताने मृत्यूशी झुंज दिली. ४ मार्च रोजी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. दरम्यान, गोंदिया पोलिसांनी तिच्या मृत्यूची नोंद घेतली.