ब्रुसेल्स : बेल्जियममधील एका शहरात माजी विद्यार्थ्याने तब्बल तीन दशकांनंतर आपल्या शिक्षिकेची अत्यंत क्रूरपणे हत्या केली आहे. शाळेत केलेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी विद्यार्थ्याने हे पाऊल उचलल्याचे तपासातून समोर आले आहे(Teacher stabbed 101 times; Take revenge for the insults taken 30 years ago).
गुंटर उव्हेन्ट्स असे या आरोपी विद्यार्थ्याचे नाव आहे. शिक्षिका मारिया व्हर्लिंडेन यांनी 1990 मध्ये या विद्यार्थ्यांचा सर्वांसमोर अपमान केला होता. यावेळी आरोपी फक्त सात वर्षांचा होता. तरी देखील मारिया यांनी केलेला अपमान कित्येक वर्षे उलटून गेली तरी तो विसरला नव्हता. त्यामुळे त्याने 2020 मध्ये 59 वर्षीय मारिया यांची त्यांच्या राहत्या घरी अत्यंत क्रूरपणे हत्या केली. त्याने चक्क 101 वेळा मारिया यांच्यावर चाकूने वार केले.
यानंतर तो तिथून फरार झाला होता. पोलिसांचा तपासानुसार, घरातले सर्व पैसे तसेच असल्यामुळे हा खून चोरीच्या हेतूने न झाल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र तरी देखील या खुनाचा शोध लावण्यास पोलिस अपयशी ठरत होते.
अनेक वर्षांनंतर दिली कबुलीशेवटी हत्येचे कित्येक वर्षे उलटून गेल्यानंतर गुंटरने आपल्या मित्राला आपण केलेल्या कृत्याची माहिती दिली. यावेळेस त्याने आता आपल्याला पश्चाताप वाटत असल्याचे देखील मित्राला बोलून दाखविले. त्याच्या मित्राला हे सर्व ऐकून धक्काच बसला. यामुळे त्याने ताबडतोब पोलिसांशी संपर्क साधला. त्यानुसार पोलिसांनी त्याला अटक केली. पोलिसांनी घटनास्थळी सापडलेल्या डीएनए नमुन्यांची आणि आरोपीच्या नमुन्यांची तपासणी केली आहे. यातून गुंटरच मारियाच्या हत्येचा आरोपी असल्याचे सिद्ध झाले आहे.