महिला डॉक्टरने गळफास घेऊन केली आत्महत्या |
गोंदिया ( Female Doctor Commits Suicide in Gondia ) : तिरोडा तालुक्यातील सेजगाव येथील एका महिला डॉक्टरने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची शुक्रवारी सकाळी ९ वाजता उघडकीस आली. डॉ.नेहा हेमराज पारधी (वय ३०) ( Dr. Neha Hemraj Pardhi ) मृत डॉक्टर महिलेचे नाव आहे.
डॉ. नेहा पारधी ( Dr. Neha Pardhi ) या तिरोडा येथील शहीद मिश्रा वॉर्ड येथे भाड्याच्या खोलीत राहात होत्या. त्या दंत रोग तज्ज्ञ ( Dental specialist ) असून त्यांचे तिरोडा येथे क्लिनिक होते. शुक्रवारी सकाळी ९ वाजता त्या खोली बाहेर न पडल्यामुळे घरमालकाने त्यांच्या खोलीकडे पाहिले असता त्यांच्या खोलीचे दार आतून बंद होते. याची सूचना त्यांनी लगेच डॉक्टरच्या वडिलांना दिली. डॉक्टरच्या वडिलांनी खोलीवर येऊन पाहणी केली असता डॉ. नेहा पारधी ( Dr. Neha Pardhi ) यांनी आपल्या खोलीत गळफास घेतला होता. ( Female Doctor Commits Suicide in Gondia )
विशेष म्हणजे महिनाभरापूर्वी त्यांचा साखरपुडा झाला होता. त्यांच्या आत्महत्येमागील कारण हे कळू शकले नाही. यासंदर्भात तिरोडा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक राधा लाटे करीत आहेत.