पुण्यात 11 वर्षीय मुलीवर घरच्यांकडूनच लैंगिक अत्याचार |
पुण्यात एका 11 वर्षीय मुलीवर तिच्याच घरच्यांकडून लैंगिक अत्याचार होत असल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी बंड गार्डन पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. शाळेच्या कॉउंसेलिंग सेशनमध्ये हा प्रकार उघडकीस आल्याची माहिती समोर आली आहे.
पीडित मुलगी ही एका कॉन्व्हेंट स्कुलची विद्यार्थिनी आहे. पीडित मुलीचे आई वडील मूकबधिर असल्याची माहिती समोर आली आहे. हे कुटुंब मूळचं बिहारचं असून गेल्या अनेक वर्षांपासून या मुलीसोबत लैंगिक अत्याचार होत होते. यात आणखी धक्कादायक म्हणजे तिच्याच वडिलांकडून तिच्यावर लैंगिक अत्याचार होत होते. फक्त, वडिलच नाही तर भाऊ, चुलत मामा आणि आजोबा यांच्याकडूनही तिच्यावर वर्षानुवर्षे लैंगिक अत्याचार होत असल्याची माहिती समोर आली आहे.
याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी तिचे वडील आणि भावासह 4 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरु आहे.