बल्लारपूर (Ballarpur ) :- होळी ( Holi ) हा रंगाचा उत्सव या सणाच्या निमित्ताने आपले मतभेद मनभेद विसरून एकोप्याने राहण्याचा दिवस आहे. मात्र होळी किंवा रंगपंचमीच्या दिवशी अशा काही घटना घडतात. ज्या आयुष्यभर मनाला चटका लावून जातात अशीच एक घटना बल्लारपूर शहरात घडली.
बल्लारपूर शहरातील सातखोली परिसर गुरुनानक विज्ञान महाविद्यालय लगतच्या परिसरातील रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते अजय चव्हाण यांचा मुलगा कुणाल चव्हाण वय-१९ वर्ष हा १८ मार्च ला होळी खेळून झाल्यावर आपल्या मित्रासोबत पार्टी करण्याच्या निमिताने कळमना मार्गावरील कोर्ती-मक्ता येथील शेतात गेले असता सायंकाळी ६:३० वाजता पार्टी करत असताना उच्च दाबाच्या विजेचा करंट लागल्याचे वृत्त आहे.
या घटनेची माहिती कळताच सदर युवकाला चंद्रपुरातील (Chandrapur ) पोद्दार रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र संबंधित डाक्टरांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर केले येथील डॉक्टरांनी तपासले असता त्यांनी सदर युवकाला मृत घोषित केले.
याविषयीच्या अधिक माहितीनुसार कुणाल चव्हाण व त्यांचे मित्र शेतात पार्टी करण्यासाठी गेले असता विजेचे कनेक्शन घेण्यासाठी तार जोडत असतांना हाय व्होल्टेज करंट शी संपर्क आल्यामुळे सदर घटना घडली व यामुळं कुणाल ला आपला जीव गमवावा लागला या घटनेमुळे बल्लारपूर शहरातील गुरुनानक विज्ञान महाविद्यालय परिसरात शोकाकुल वातावरण असून या घटनेचा पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत आहे.