सावली:- सावली पोलीस स्टेशन अंतर्गत होळी व धुलीवंदन या सणानिमित्त अवैद्य दारू तस्करी यावर प्रतिबंध घालण्याकरिता एक पथक तयार केले होते. हे पथक गस्त घालत असता मिळालेल्या माहितीनुसार व्यंकिस बार चंद्रपूर -गडचिरोली हायवे वर ओलंकेसवोगेंन कार क्र. MH-34 AF 4440 कारची झडती घेतली असता या कर मध्ये 90 मिली रॉकेट देशी दारूचे 28 बॉक्स मिळून आले याची अंदाजे किंमत 84 हजार रुपये व कारची किंमत 1 लाख रुपये असा एकूण 1 लाख 84 हजार रुपयाचा माल सापडला असून, आरोपी वैभव भक्तदास ठाकरे वय 24वर्ष, सचिन अरविंद वडपल्लीवार वय 22 वर्षे दोन्ही आरोपी राहणार मोहजरी जि. गडचिरोली यांना अटक करून गुन्हा दाखल केला.
सदरची कारवाही उपविभागीय पोलीस अधिकारी इंगळे साहेब, सावली चे ठाणेदार आशिष बोरकर साहेब यांचे मार्गदर्शनात पो.उ.नि. चीचघरे, पो.ह.दिलीप मोहूर्ले, ना.पो.का. केवल तुरे, विशाल दुर्योधन,धीरज चव्हाण,श्रीकांत वाढई,यांनी केली.
पुढील तपास सुरू असून ही देशी दारू कोणत्या दारू दुकानातून जात होती हे गूढ कायम आहे.
सावलीचे ठाणेदार आशीष बोरकर हे अवैध धंदा करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यामुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.